TAJDHAM PAGALKHANA SHARIF

आरती २

|| ॐ नमो ताजुद्दीनाय नमः ||

आरती ओवाळु सदगुरु ताजुदीनाची ||
बाबा ताजुदीनाची |
कृपा आम्हांवरी व्हावी 2, सदगुरु रायाची ||
बाबा ताजुदीनाची |
जडतीय ताराया जगी सदगुरु अवतरला ||
बाबा सदगुरु अवतरला |
सुख - शांती सुमंगल करण्या 2, अवनीवर आला ||
बाबा ताजुदीनाची |
आत्म्यांची ब्रह्मांडाचं स्वरूप दाखविलें ||
बाबा स्वरूप दाखविले |
आधी व्याधीं अवध्यानाही 2,दुरची सारियले
बाबा ताजुदीनाची |
संकट येता भक्तावरी तु धावुनिया आला ||
बाबा धावुनिया आला |
शरण तुझा चरणशी येता 2, कृपा सिंधू झाला ||
बाबा ताजुदीनाची |
दया धना तव दया दावुनी अमृत कि दिधलें ,
बाबा अमृत कि दिधलें ,
जे जे भजतिल तुझला त्यांचे 2, तारण तु केले ||
बाबा ताजुदीनाची |
आरती ओवाळु सदगुरु ताजुदीनाची ||
कृपा आम्हांवरी व्हावी 2, सदगुरु रायाची ||
बाबा ताजुदीनाची |