TAJDHAM PAGALKHANA SHARIF

आरती ४

          जय जय ताज देवा,पंच प्राणचा ठेवा I
          आरती ओवळीतों घेई दासाची सेवा II
          जय जय ताज देवा,
          कलयुग अवतारी,गुरुस्वमी दिगंबर I
          भक्त जण तारण्यासी,आले बाबा अवतारी II
          जय जय ताज देवा,
          बाबा तुमच्या स्वरूपात,प्रभु रुपे अनंत I
          दखविशी ताजनाथा,तुझे लागेना अंत I
          जय जय ताज देवा,
          बाबा तुमचे नाव घेता,टळे संसाराची चिंता I
          तुमचा ध्यान धरता, टळे अवघी चिंता II
          जय जय ताज देवा,
          मना जैसा ज्याचा भाव,तैसी पावे ताज देवा I
          अगाध तुझी लीला,बाबा संकटी धाव II
          जय जय ताज देवा,
          आठव्य दिवशी गुरुवारी,भक्त करीतात वारी I
          जपतप करण्याशी येतात पागलखान्याशी
          जय जय ताजदेवा पंच प्राणचाठेवा,
          आरती ओवळीतों घेई दासाची सेवा II
        हरे हरे बाबा,हरे हरे बाबा I बाबा बाबा हरे हरे II
        हरे हरे बाबा,हरे हरे बाबा I ताजुद्दीना हरे हरे II