TAJDHAM PAGALKHANA SHARIF

करुनाष्टक

            आम्ही अज्ञ देवा तुझ्या दारी आलो,आम्ही वासनांच्या प्रवाही बुड़ालों I
            तुम्हा वीण कोणी नसे तारण्याला I करुणानिधाना प्रभु ताजुद्दीना I
            आम्ही पाप राशी सवे जोड़ीयेल्या I ना भक्ति ना पूजा वृथा जन्म गेला I
            तुझे नाव ऐकुनी आलो दयाळा I करुणानिधाना प्राभु तजुद्दीना I
            जरा अधि-व्याधि जगी ताप तिन्ही I आम्हाला निवारा नसे कोठलाही I
            तुझ्या पाऊलासी असु दे निवारा I करुणानिधाना प्रभु ताजुद्दीना I
            मृतानां दिले तु पुन्हा जीवदाना I म्हणे पावलासी किती पापियांना I
            क्षणी पाव बाबा आम्हा पामरांना I करुणानिधाना प्रभु ताजुद्दीना I
            तृषा शांतवाया मुक्या श्वापदांची I स्वये धावला तु दिघोरीस स्वामी I
            तृषा आमुचि शांतता दीनानाथ I करुणानिधाना प्रभु ताजुद्दीना I
            कुणी रामचंद्र तुझ्या ठाही पाहे I कुणी शंकराला कुणी कृष्ण पाहे I
            अनेकांनी नाना रुपे पहियेला,करुणानिधाना प्रभु ताजुद्दीना I
            कराया मला आंधळा दीन दुःखी I बघा काम क्रोधासवे मोह येते I
            मदाच्या सवे लोभ घालित घाला ,करुणानिधाना प्रभु ताजुद्दीना I
            नसे धीर आता न काही सुचेना,तुम्ही लक्ष द्यावे कृपेच्या निधाना I
            असे दास पापी तथा उद्धाराया Iकरुणानिधाना प्रभु ताजुद्दीना I
            अनंतकोटी,ब्र्म्हांडनायक राजाधिराज,महायोगीराज,
            परब्र्ह्म,सच्चीदानंद,भक्तप्रतिपालक,पागलखाना तापस्वी !!
            !!श्री संत ताजुद्दीन बाबा की जय !!
            II कर्पूर गौरमं, करुणावतारमं, संसारसारमं,
            
            भूजगेंद्रहारमं I सदाव संतमं हृदयाल वन्दे,
            भावंम भवामी संहीत्तम नमामी,मंदार माला
            कृपालकायमं कपाल माला शिवशंकरायं,
            दिगंबराय,दिगंबराय,ॐ नमः शिवाय,ॐ नमः शिवाय
            II ॐ कर्पूर दिपंम,धूपमं नैव्यदमं समरपायमी  II